Thursday, April 25, 2024
Homeशैक्षणिक‘भविष्या’तही दडल्या आहेत संधी !

‘भविष्या’तही दडल्या आहेत संधी !

भविष्य पाहणं हा अनेकांचा छंद असतो तर अनेकांच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय या ग्रह तार्‍यांवर अवलंबून असतात. भविष्याबद्दलची उत्सुकता लोकांच्या मनात अनादी काळापासून आहे आणि ती कायम वाढतच राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ञांचा बोलबाला कायम राहणार. हे क्षेत्रही आता नव्या तंत्राशी जुळवून घेत कात टाकतंय. कुडबुड्या जोतिष्यांची जागा आता सफाईदार इंग्रजी बोलणार्‍या आणि हातात लॅपटॉप घेतलेल्या अ‍ॅस्ट्रोलॉजिस्ट यांनी घेतली आहे. या शास्त्राला जगभरातील विद्यापीठातून मान्यता मिळत असून त्यासाठी वेगवेगळ्या परिषदाही आयोजित केल्या जातात. या विभागात कारकिर्दीच्या संधी कोणत्या? त्यासाठी कोणते अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील ? याचे प्रशिक्षण कुठे घ्याल याविषयी…

भविष्य कथन हे एक शास्त्र म्हणून मान्यता मिळायला आता सुरूवात झाली आहे. भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता अनादी काळापासून माणसाकडे आहे. त्यामुळे या क्षेत्राला सतत मागणी असते. पूर्वी हे शास्त्र नसून दैवी शक्ती असल्याचा आणि ते काही लोकांपुरताच मर्यादित असल्याचा समज होता पण कालौघात आता हे एक शास्त्र असल्याचं सिध्द झालं आहे.

- Advertisement -

याचा अभ्यास करायचा झाल्यास भविष्यकथन हा देखील एक कारकिर्द घडवण्याचा पर्याय असल्याचं दिसून आले आहे. म्हणूनच या भविष्यातील संधीवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. भविष्य कथन ही भारतातीच नाही तर अनेक देशांची परंपरा आहे. त्यांच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत. कुणी कुंडली मांडतं तर कुणी चेहरा किंवा हात पाहून अंदाज सांगतं. कुणी पत्त्यावरून भविष्य वर्तवतं तर कुणी आणखी कोणत्या पध्दतीने. पण भविष्य सांगणं आणि त्याची प्रतिची यात विश्‍वासाचा मोठा भाग आहे. अनेकांना तो प्रत्यय आला असल्यानेच भविष्यकथन हा समाजाच्या मनाच्या जवळचा विषय आहे.

आज भविष्यकथनला सामाजिक दर्जा मिळाला आहे. पूर्वी कुडमुड्या ज्योतिषाची चोपडी असायची. तो चेहरा किंवा कुंडली पाहून भविष्य सांगायचा. नंतर तर तो उदारनिर्वाहाचा एक धंदा झाला. त्यात अनेकांनी काही अभ्यास नसताना पोटभर्‍या व्यवसाय म्हणून त्याचा वापर केला त्यामुळे या शास्त्रावरचा विश्‍वास उडाला होता. पण आता जगातील अनेक विद्यापिठांनी मान्य केलं आहे की भविष्यकथनाची भारतीय पध्दत ही शास्त्रशुध्द असून त्यानुसार मांडलेले अनुमान बर्‍याच अंशी खरे निघतात. अंधार्‍या वाटेवर जाताना हातात टॉर्च ठेवण्याची जी सावधगिरी आहे तीच भविष्याचा आधार घेऊन पुढील निर्णय घेण्यात बाळगली तर हे शास्त्र नक्कीच उपरुक्त ठरू शकेल.

आज भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य माणसालाच नाही तर राजकारणी, व्यावसायिक, गुंतवणूकदार अशा अनेकांना असते. काही कॉर्पोरेट हाऊसेस मध्ये तर नोकरीवर ठेवल्या जाणार्‍या माणसाचे ग्रह आपल्या उद्योगासाठी अनुकूल आहेत की नाहीत हे पाहण्याची फॅशनच निर्माण झाली आहे. राजकारणात तर तिकीट मिळेल की नाही इथपासून ते पद मिळेल की नाही अशा अनेक प्रश्‍नांसाठी ज्योतिषाची मदत घेतली जाते. मंदीच्या काळात अनेक सामान्य लोकही आपल्या भविष्याबद्दल चिंतीत होऊन पुढे कार होणार यासाठी ज्योतिषाची पायरी चढताना दिसतात. काही मोठ्या शहरात तर कार्पोरेट स्तरावर भविष्यकथनाचा व्यवसाय चालतो. अहमदाबादमध्ये भविष्यविषयक एक मॉल उभारला गेला असून तिथे या विषयाशी संबंधित प्रत्येक गोष्टीची विक्री होते. हे चित्र पाहता भविष्य जाणून घेण्याच हे शास्त्र भविष्यात अनेकांची कारकिर्द घडवेल असं म्हणारला काहीच हरकत नाही.

भविष्यकथनात कारकिर्द करायची असेल तर त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहेच. ते तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतंत्रपणे त्याचा अभ्यासही करू शकता. एखाद्या ज्योतिषाच्या हाताखाली काम करून अनुभवही घेऊ शकता. त्यासाठी विशिष्ट अशी वयोमर्यादा किंवा शैक्षणिक पात्रता लागत नाही. मात्र या क्षेत्राचा गणिताशी जवळचा संबंध असल्याने त्यात गती असणं गरजेचं आहे. आता या क्षेत्रात तंत्रज्ञानाने शिरकावा केल्याने तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कुंडली मांडण्यासारखी कला अवगत असणं गरजेचं आहे. अनेक सरकारी किंवा खाजगी संस्थेत ज्योतिषविषयक डिप्लोमा किंवा पदवीचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यातही अनेक प्रकार आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारात रस आहे हे ठरवून त्याची निवड करावी.

या क्षेत्रात नाव कमावण्याच्या अनेक संधी आहेत. तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करू शकता किंवा जोडधंदा म्हणून याचा वापर करू शकता. तुमचे अंदाज जितके बरोबर येतील तितका लोकांचा विश्‍वास वाढेल आणि तुमची लोकप्रियताही. आजकाल तर राजकारण्यासाठी किंवा व्यावसायिकांसाठी काम करणारे वेगळे ज्योतिषी पाहायला मिळतात. यात तुम्ही शिक्षक म्हणूनही काम करू शकता.तुमचे ज्योतिषविद्या शिकवण्याचे क्लासेस घेऊ शकता. रोजगाराच्या अनेक संधी येथे उपलब्ध होतात.

या क्षेत्रातील नामवंत अभ्यासक्रम निवडायचा झाल्यास खालील ठिकाणी संपर्क साधता येईल.
भारतीय विद्या भवन, कस्तूरबा मार्ग , नवी दिल्ली
भारतीय इंनिस्टट्यूट ऑफ वैदीक अ‍ॅस्ट्रोलॉजी, हरिराणा
इन्स्टिट्यूट ऑफ वैदीक स्टडीज, इंदोर

- Advertisment -

ताज्या बातम्या