Tuesday, April 23, 2024
Homeशैक्षणिककृषी क्षेत्रातील संधी

कृषी क्षेत्रातील संधी

आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतीमध्ये कोणते नवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा शेती करताना कसा उपयोग होईल; तसेच शेतीला पूरक असे कोणते व्यवसाय करता येतील, या प्रश्‍नांची उत्तरे शोधू पाहणार्‍यांसाठी बारामतीच्या कृषी कॉलेजने दोन नवे पदवी अभ्यासक्रम तयार केले आहेत. त्याविषयी…

बारातमीच्या कृषी कॉलेजने नेदरलँड्समधील व्हॅन व्हॉल लारेन्स्टाईन इन्स्ट्यिूटशी करार करून 3+1 वर्षे आणि 2+2 वर्षे असे आंतरराष्ट्रीय कृषी पदवी अभ्यासक्रम तयार केले आहेत. या अभ्यासक्रमास भारतीय कृषी अनुसंधान परिषद व महात्मा ङ्गुले कृषी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. 3+1 या अभ्यासक्रमात पदवीची पहिली तीन वर्षे भारतात, अर्थात बारातमीच्या कॉलेजमध्ये व शेवटचे एक वर्ष नेदरलँड्स येथील संबंधित विद्यापीठात पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेदरलँड्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

- Advertisement -

दुसरा अभ्यासक्रम 2+2 वर्षांचा असून, वॉखनिंगन विद्यापीठाचा हा अ‍ॅटोनॉमस पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमांतर्गत दोन वर्षे बारमतीच्या कॉलेजमध्ये, तर उर्वरित दोन वर्षे नेदरलँड्समध्ये शिकायला मिळणार आहे. या प्रकारच्या अभ्यासक्रमाला अनुसंधान परिषदेने मान्यता दिली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचे मूल्यांकन परिषद व नेदरलँड्स येथील एनव्हीएओ ही अग्रगण्य शैक्षणिक मूल्यांकन समिती करणार आहे. अभ्यासक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नेदरलँडला जाऊन तेथील शेतीच्या प्रगतीचे कोडे समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये : लर्निंग बाय डुईंग, लर्निंग बाय डिस्कव्हरिंग, सिच्युएशन स्पेसिङ्गिक लर्निंग, व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चांगल्या प्रतीचे उत्पादन, योग्य प्रकारे विक्री व्यवस्थापन अथवा प्रक्रिया उद्योग व व्यसायावर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली, प्रात्याक्षिकांवर भर, व्यवसायाभिमुख कौशल्ये, विषयाशी निगडित भेटी, बाजारपेठ सर्वेक्षण, सिम्युलेशन, कृषी पदवी शिक्षणात स्पेशलायझेशन ही अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये. माहिती कौशल्ये व दृष्टीकोन या पातळीवर विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या निकषांवर गुण दिले जाणार आहेत. हेही याचे वैशिष्ट्य आहे. व्यवहार व व्यवसायिक म्हणजेच तांत्रिक आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोनावर आधारित ज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाद्वारे करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानावर सुरू असणारे प्रकल्प, शेती आणि उद्योग यांच्यात प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षण (इंटर्नशिप), जागतिक हवमान बदलामुळे निर्माण होणार्‍या समस्या, उपाययोजना यांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. अभ्यासक्रमाची रचना फेरसचना दरवर्षी केली जाणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हुरी कृषी विद्यापीठासह नेदरलँड्सच्या विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र मिळणार असल्याने त्यांच्या माध्यमातून देशासह विदेशातही नोकरी, उच्च शिक्षणाची संधी आपोआपच मिळणार आहे.

पात्रता : पदवीच्या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, विज्ञान शाखेत जीवशास्त्र हा विषय असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची निवड ही लेखी परीक्षेसह मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 20 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा घेतली जाईल. त्यात लेखी परीक्षेसाठी 50 गुण, तर तोंडी परीक्षेसाठीही 50 गुण दिले जाणार आहेत. लेखी परीक्षेत इंग्रजीवर प्रभुत्व किती आहे, याची चाचणी घेतली जाईल.

उद्देश : कृषी शिक्षण व संशोधनात रुची निर्माण व्हावी, शेतीची गोडी निर्माण व्हावी, जागतिक हवामान बदल व समस्या, उपाययोजना याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित व्हावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधीमिळावी, या हेतूने अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.

भविष्यातील योजना : इंटरनॅशनल हॉर्टीकल्चर अँड मार्केटिंग व इंटरनॅशनल अ‍ॅग्रीबिझनेस अँड ट्रेड यामध्ये स्पेशलायझेशन करता येईल.
भविष्यात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, जैवतंत्रज्ञान अशा इतर कृषी विषयांमध्ये स्पेशलायझेशन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

संधी : विद्यार्थ्यांना भारतात व इतर देशांमध्ये तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे; तसेच आयात निर्यात करणारी कंपनी विकसित करता येईल. स्वतःचा व्यवसाय विकसित करून शेतीशी निगडित पूरक उद्योग, व्यवसायही करता येईल
आयात-निर्यातीमुळे बँकिंग क्षेत्राचीही मागणी असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या