एका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले

0
न्यूयॉर्क : उच्चभ्रू लोक आपली स्टाईल राहणीमान, जीवनमान जगण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. एका नंबर प्लेटच्या किमतीवरून त्याचीच प्रचिती आली आहे.
ब्रिटनमध्ये जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट विकण्यात आली आहे. एका धनकुबेराने त्या एका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले आहेत. या नंबर प्लेटवर F1 असा क्रमांक आहे.
साऱ्या जगात हा क्रमांक अतिशय लोकप्रिय आहे. सोबतच, मर्सेडीज, मॅकलॅरेन SLR, रेंज रोव्हर आणि बुगाटीसह अनेक कंपन्या हा नंबर बनवतात.
या नंबरच्या किमतीची भारतात मिळणाऱ्या मर्सेडीझ ए-क्लास कारच्या (29.31 लाख रुपये) किमतीशी तुलना केल्यास, त्या एका नंबरच्या तुलनेत 400 मर्सेडीझ विकत घेता येतील. हौसेला मौल नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हि नंबर प्लेट होय.

LEAVE A REPLY

*