Cannes 2018 : कान्स फेस्टिव्हलमध्ये मल्लिका शेरावत झाली पिंजऱ्यात कैद 

0
मुंबई : ७१ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१८ मध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सहभागी होत आपला जलवा दाखविला.कान्समध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री सोनम कपूर आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन यांची रेड कार्पेटवरील एंट्री विशेष आकर्षक ठरली. यावेळी कान्समध्ये पाहोचलेल्या अभिनेत्री मल्लिका शेरावतचाही जलवा बघण्यासारखा होता. बॉलिवूडची हॉट बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतने ही कान्स फेस्टिव्हलमध्ये वर्णी लावली. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ मल्लिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती पिंजऱ्यात कैद आहे आणि सपोर्ट करण्याची विनंती करत आहे. ही विनंती नसून हा जगभरातील लोकांसाठी संदेश आहे.

लहान मुलांवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबविले जावेत हा संदेश देण्यासाठीच मल्लिकाने स्वत:ला पिंजºयात कैद केले. तिने ‘लॉक-मी-अप’ या कॅम्पेनचा भाग बनून चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रोस्टिट्यूशन विरोधात आवाज उठविला. या मुद्द्यावर जगभरातील लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी होऊच शकत नाही. भारतातच नव्हे तर जगभरातील बाल वेश्यावृत्तीविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांत उत्तम व्यासपीठ आहे. असे म्हणत मल्लिकाने स्वत:ला पिंजºयात कैद करून काही फोटो काढले.

LEAVE A REPLY

*