Video : नोटबंदीच्या निषेधार्थ शहरात सर्वपक्षीय मोर्चा; मेणबत्त्या पेटवून नोटबंदीत मृत पावलेल्यांना वाहीली श्रध्दांजली

0
नाशिक । सर्वपक्षिय नोटबंदी कृती समितीने आज केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शालिमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ 120 मेनबत्या लावत नोटबंदीत मृत झालेल्या नागरीकांना आदरांजली वाहण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द् करण्याचा निर्णय घेतला आज या नोटबंदीला एक वर्षपुर्ण झाल्यानंतर नोटबंदीने वर्षभरात काय साध्य केले याचा लेखाजोखा मांडत सर्वपक्षिय कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बीडीभालेकर येथुन सायंकाळी 5 च्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ झाला.त्यानंतर हा मोर्चा शालिमार,नेहरु गार्डन,एमजीरोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएसहुन शालिमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ गेला.

या ठिकाणी सर्वपक्षियांकडुन नोटबंदीच्या काळात मृत झालेल्या 120 नागरीकांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ.संजय अपरांती यांनी नोट बंदीच्या फसलेल्या मोदी सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, जर मोठ्या रकमेच्या नोटांमुळे काळा पैसा निर्माण होण्याला मदत होते असे सरकारला वाटत असेल तर मग हजार रुपयांची नोट रद्द् करुन त्याऐवजी दोन हजार रुपयांची नवीन नोट आणण्याचे कारणच काय?

यामुळे काळा पैसा निर्माण होणे आणि त्याची साठवणूक करण्याला नरेंद्र मोदी तर मदत करत नाही ना ?, तसेच सरकारने गव्हर्नर रघुराम राजन यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष का केले ? असा प्रश्न उपस्थित के ला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी सरकाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*