Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : अवघ्या तीन मिनिटांनी हुकला महिलेचा उमेदवारी अर्ज; पूर्व विभाग कार्यालयातून उडी मारण्याचा प्रयत्न

Share

नाशिक | प्रतिनिधी

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या तीन मिनिटांचा उशीर झाल्याने नाशिक पूर्व साठी एक इच्छुक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येते. अर्ज दाखल करणार तेवढ्यात वेळ संपल्याचे सांगत कक्षाचा दरवाजा बंद होतो. यानंतर महिलेचा संताप अनावर झाला. महिलेने थेट पूर्व विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरून उडी घेण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी या महिलेला खाली आणत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

नाशिक पूर्व मतदारसंघात अपक्ष उमेदवार असणाऱ्या शीतल पांडे यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला.

वेळ संपल्याने महिलेचा ठिय्या

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याने महिलेचा 'ठिय्या'; हिंदी मराठी इंग्रजीतून रोष व्यक्त

Posted by Deshdoot on Friday, 4 October 2019

 

दरम्यान, आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासून शहरात विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, तीन वाजेनंतर या महिला उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांच्या मते वेळ संपल्याने अर्ज स्वकारता येणार नसल्याचा निर्वाळा दिल्याने या महिला उमेदवाराने ठिय्या मांडत आपली व्यथा कथन केली.

ही महिला लोकतंत्र जनशक्ती पार्टीची उमेदवार असल्याचे सांगत होती. तसेच आपण गेल्या अनेक वर्षांपासून धुणी भांडी करून उदरनिर्वाह करत असल्याचेही ती म्हणाले. गरिबांसाठी इथे जागा नाही का? असाही सवाल उपस्थित करत तिने रोष व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!