Type to search

Breaking News Featured नाशिक

कर्करोगी व्यक्तीला केवळ नातेवाइकांचे प्रेम हवे असते : डॉ. राज नगरकर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

कर्करोगी व्यक्तीला केवळ घरातील नागरिकांचे प्रेम हवे असते. ते प्रेम त्याला मिळाले पाहिजे असे प्रतिपादन एचसीजी मानवता चे संचालक डॉ. राज नगरकर यांनी केले. ते इंदिरानगर परिसरातील संताजी बहुउद्येशीय हाँल मध्ये पब्लिक सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संबोधित करत होते.

डॉ. नगरकर म्हणाले, कर्करोग पिडीत व्यक्तिला नेमके काय हवे असते? या व्यक्तींना केवळ आपल्या नातेवाइकांच्या नजरेत दिसणारे प्रेम हवे असते.

जे त्यांना मिळत नाही म्हणुनच ते जास्त खचतात आजारपणाला कंटाळतात. त्यामुळे समाजाने व नातेवाइकांनी कर्करोग बाधीत व्यक्तिला आधार दिल्यास ते आपले जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करु शकतील व सकारात्तमक पद्धतीने ते जीवनाकडे पाहू लागतील असे सांगितले.

कर्करोग कोणालाही होऊ शकतो, त्यामुळे हा आजार होऊच नये यासाठी आपण सेल्प टाँक करणे गरजेचे आहे. हा आजार हा चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढत आहे. कोणतातरी छंद जोपासणे यासाठी गरजेचे आहे व त्याचबरोबर छोटया छोटया गोष्टीत आनंद घेता यायला हवा. कर्करोग होऊच नये यासाठी काही लसी उपलब्ध आहेत ज्या १८-२० या काळात घेता येतात असेही ते म्हणाले.

यावेळी डाँ. नागेश मदनूनकर हेदेखील उपस्थित होते. त्यांनी कर्करोगासंबधीची सखोल माहिती पीपीटीदवारे विषद केली. तंबाखु, सिगारेट व तोंडाचा कर्करोगाचा संबध स्पष्ट केला. धोक्याचे घटक, स्तनाचा कर्करोगाचे वाढते प्रमाण, कर्करोग होऊच नये म्हणून घ्यावयाची काळजी सविस्तरपणे स्पष्ट केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजनी पाटील, डाँ.एस.डी सुर्यवंशी, डाँ.योगेंद्र सुर्यवंशी, डाँ.वैशाली सुर्यवंशी,  आदित्य वाघ, पल्लवी पाटील, पल्लवी वाघ, अनघा दिक्षीत, मते, चेतन पवार यांनी मेहनत घेतली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!