मराठवाड्यातील काही सिंचन प्रकल्प वर्षभरातच पूर्ण; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

0

मुंबई, ता. २०, ता. : मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न आणि तेथील योजना वेगाने मार्गी लावण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलविली. त्यात संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश होता.

विविध १५ विभागांच्या माध्यमातून आतापर्यंत मराठवाड्यासाठीं ३० निर्णय घेण्यात आले होते. त्यापैकी १७ निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून इतर निर्णयांसाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

सिंचन प्रकल्पांसह जलयुक्त शिवार, कॅन्सर हॉस्पिटल, कौटुंबिक न्यायालय  आदींचा या बैठकीत आढावा घेऊन काही कामांना तत्काळ मंजूरी देण्यात येऊन निधी निर्गमित करण्यात आला.

आतापर्यंत मराठवाड्यातील वाकी, निम्न दूधना, नांदूरमध्यमेश्वर अंतर्गत विविध प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन क्षमता आणि जलसंपादन क्षमता वाढली आहे. विशेष म्हणजे वाकी, भाम या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे, तर नांदूर मध्यमेश्वर, निम्न दूधना अंतर्गत येणाऱ्या सिंचन प्रकल्पांचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथील कॅन्सर रुग्णालयासाठी समग्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ४३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि उस्मानाबाद येथील कौटुंबिक न्यायालयाचे लवकरच उदघाटन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*