या गावात घर मिळेल १०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीला

0

इटलीमधील ऐतिहासिक गावांमधील  १०० घरे विश्वास बसणार नाही इतक्या कमी किंमतीला विक्रीला निघाली आहेत. या गावच्या महापौराने केवळ एक पाऊंडाला म्हणजेच सुमारे ८२ रुपयांत येथील ऐतिहासिक घर विक्रीला काढले आहे.

अर्थात त्यात एक अटही आहे. हे घर १ पाऊंडाला विकत घ्यायचे आणि त्याच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीसाठी किमान १८ हजार पाऊंड म्हणजेच सुमारे १५ लाख रुपये खर्च करायचे.

गांगी, सिसिली करेगा लिगर, पिडमाँट आणि लोक नी मार्सी या गावांमध्ये ही घरे आहेत. बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, इतकेच नव्हे, तर समुद्री चाच्यांच्या त्रासाला कंटाळून या गावातील लोक केव्हाच इतरत्र निघून गेले आहेत.

आता या गावात अगदीच बोटावर मोजण्याइतके लोक उरले असून सध्या भूतांचे गावे म्हणून या घरांची ओळख होत आहे.

येथे स्वच्छ सूर्यप्रकाश, प्रदुषण मुक्त हवा, डोंगर असा सुंदर नजारा अनुभवता येतो. येथील एक घर सुमारे १ हजार स्के. फुटाचे असते.

जुन्या पद्धतीचे म्हणजे एखाद्या किल्ल्याचे असावे तसे बांधकाम या गावांमध्ये पाहायला मिळाले. एका प्रसिद्ध हॉलिवूडपटाची मध्यंतरी इथे शुटिंगही झाली.

 

मात्र सध्या तरी ही गावे ओसाड झाली आहेत. काही ठिकाणी तर एका घरावर दुसरे फुकट अशीही आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. हेतू इतकाच कि लोकांनी इथे यावे, राहावे आणि गावाला पुन्हा वैभवाचे दिवस यावेत.

त्यासाठी महापौरांनी विविध पातळ्यांवर जाहिराती देणे सुरू केले आहे. त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.

LEAVE A REPLY

*