Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : अनुभव आणि अर्थनियोजन असेल तरच उद्योगाच्या स्पर्धेत टिकाव लागेल – राघव नरसले

Share

नाशिक | प्रतिनिधी

उद्योगाच्या विकासात इकोसिस्टीम असणं अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यासोबतच उद्योगांनी अनुभव व अर्थ पुरवठा याकडे लक्ष दिल्यास स्पर्धात्मक युगात उद्योगांना गरुड भरारी घेणे शक्य असल्याचे प्रतिपादन राघव नरसले यांनी केले.

आयमाच्यावतीने आयोजित दोन दिवसीय बिझनेस ते बिझनेस (B to B) परिषदेच्या उद्घाटन समारंभात श्री नरसले बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर जपानचे उद्योजक मकोटो फुजिवरा, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आयमा अध्यक्ष वरूण तलवार, कमिटी चेअरमन निखिल पांचाळ, सेक्रेटरी ललित बूब, माजी अध्यक्ष राजु अहिरे हे होते. यावेळी श्री नरसले यांनी उद्योगांच्या गती बद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी ते म्हणाले, नाशिक परिसराने पूर्वीपासूनच दादासाहेब फाळके यांच्या रूपाने जागतिक स्तरावर पाय रोवले आहेत.  आजच्या शिक्षण पद्धतीवर नाराजी व्यक्त करताना नव्या पिढीला उत्पादनाला सन्मान देण्याचे भावना निर्माण केली जात नाही. ही खंत त्यांनी व्यक्त केली.

आपण फक्त मागणी करतो मात्र मुलांना उत्पादनाकडे वळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत नाहीत. शाळांमधून उत्पादनाबद्दल प्रबोधन करणे गरजेचे आहे. शास्त्र अथवा अभियांत्रिकी विभागात उत्पादकतेवर विशेष लक्ष दिले जात नसल्याची खंत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.  उद्योगांमध्ये बिजनेस व्हॅल्यू वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात नशिक हे डिफेन्स म्हणून पुढे येत आहे. या संधीचा प्रत्येक कमी फायदा घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान प्रगत अमेरिकन डिफेन्स या माध्यमातूनच आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतानेही या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले, नाशिक करांनी या संधीचे सोने करून घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्ह्यातील वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्याचा विकास सुदृढ करण्याच्यादृष्टीने लोक जागृत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ब्रिटिशांनी प्रशासन व जनतेला विभागले होते मात्र या काळात प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा उपलब्ध होणाऱ्या प्रश्नांमधून नव्या संधी शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष वरुण तलवार यांनी केले. निखिल पांचाळ यांनी B to B मिठाची सविस्तर माहिती स्पष्ट केली आभार ललित बूब यांनी मानले.

यावेळी एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, लघुउद्योग भारती अध्यक्ष संजय महाजन, महिला बँकेच्या संस्थापक आहेर, आमदार सीमा हिरे आदींसह मोठ्या 20 उद्योगांची प्रतिनिधी उद्योजक उपस्थित होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!