Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

उद्योगपती बी. के. बिर्ला यांचे मुंबईत निधन

Share

मुंबई । प्रतिनिधी 

प्रसिद्ध उद्योगपती बसंत कुमार बिर्ला (बी.के.) यांचे आज (दि.०३) मुंबईत निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. कुमार मंगलम बिर्ला यांचे ते आजोबा होत.

बी.के. बिर्ला हे सेंच्युरी टेक्सटाईल अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षीच व्यापारक्षेत्रात पदार्पण केले होते. प्रारंभी त्यांनी केसोराम इंडस्ट्रिजचे अध्यक्षपद भूषविले.

कापूस, व्हिस्कोस , पॉलिस्टर आणि नायलॉन यार्न, रेफ्रेक्टरी, पेपर, शिपिंग, टियरकॉर्ड, पारदर्शी कागद, स्पून पाईप, सिमेंट, चहा, कॉफी, वेलची, रसायने, प्लायवूड , एमडीएफ बोर्ड आदींवर लक्ष केंद्रित करून इंडो इथियोपियन टेक्सटाइल्स शेअर कंपनीची स्थापना केली.

ते कृष्णार्पण चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष होते. या ट्रस्टमार्फत राजस्थानमध्ये बी. के. बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे इंजिनियरिंग कॉलेज चालवतात.

कतरमधील बिर्ला पब्लिक स्कूल आणि कल्याण येथील विज्ञान व वाणिज्य विभागाच्या बिर्ला कॉलेजची स्थापना केली आहे . त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात सुखयाह या आत्मकथेचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!