Type to search

Featured सार्वमत

नगर: बस स्टॅण्डवर कंडक्टरला मारहाण

Share

अवैध प्रवासी वाहतूकदाराची दादागिरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरमधील स्वस्तिक चौकातील तीन नंबर बस स्टॅण्डमध्ये एस.टी.च्या कंडाक्टरला मारहाण करून तिकिट मशीनची तोडफोड करण्यात आली. काल बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय बबन चव्हाण (रा. शिरूर,पुणे, मुळ करंजी,ता.पाथर्डी ) असे मारहाण झालेल्या कंडाक्टरचे नाव असून त्यांनींच पोलिसांत फिर्याद दिली आहे. चालक बस नोंदविण्यासाठी डेपोत गेल्याने पुण्याकडे जाणार्‍या एस टी (एम एच-14, बी टी 13171) जवळ चव्हाण उभे होेते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तेथे आला. तो बसमधील प्रवासी उतरून घेऊन जात असताना चव्हाण यांनी त्याला अडविले. प्रवाशांना घेऊन जाऊ नको, असे म्हणाल्याचा रागातून त्याने आणखी दोघांना इशारा करून बोलावून घेतले. या तिघांनी शिवीगाळ मारहाण करून चव्हाण यांच्या ताब्यातील तिकीट देण्याचे मशीन फोडले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!