हिजबुलचा कमांडर व बुऱहान वाणीचा उत्तराधिकारी सबजार गोळीबारात ठार

0

श्रीनगर, ता. २७ : घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ८ अतिरेक्यांना आज भारतीय जवानांनी कंठस्थान घातले. त्यामध्ये बुरहान वाणीचा उत्तराधिकारीही व हिजबुलचा कमांडर सबजार मारला गेला आहे.

दक्षिण जम्मू आणि कश्मिरमधील रामपूर सेक्टर येथे सीमेपलिकडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणारे सहा अतिरेकी भारतीय सैन्याने ठार केले.

या परिसरात गस्तीवर असलेल्या सैनिकांना संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यांनी सतर्क होऊन अतिरेक्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

तसेच ट्राल सेक्टरमधेही दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले असून या परिसरात शोध मोहिम सुरू आहे. तसेच सैन्याची कारवाई सुरू असल्याचे समजते.

कंठस्नान घातले असून या परिसरात शोध मोहिम सुरू आहे. तसेच सैन्याची कारवाई सुरू असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*