Type to search

जळगाव शैक्षणिक

खेळाडूंना रोजगाराच्या संधी-प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण

Share

जळगाव । प्रतिनिधी

विविध खेळांमध्ये करियर उपलब्ध असून शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा विशेष गुणांसह रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन बी.यू.एन.रायसोनी मराठी शाळेत आयोजीत क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी जळगाव जिल्हा अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.पी.आर.चौधरी यांनी व्यक्त केले.

भाऊसाहेब उत्तमचंद नेमिचंद रायसोनी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यात मराठी विभागातील पुर्व प्राथमिक विभाग ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध खेळ प्रकारांच्या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला.

यात प्रथम, द्वितीय क्रमांकाने आलेल्या यशस्वी खेळाडू स्पर्धकांना आज दि.26 रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक संचालक प्रा.डॉ.पी.आर.चौधरी हे होते.

तर प्रमुख पाहुणे टेनिस खेळाचे विद्यापीठ खेळाडू तथा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाल येथील प्रा.डॉ.अमोल पाटील तसेच मुंबई एटीएस विभागातील प्रविण पुंडलीक भालेराव हे होते.

मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांनी केला. क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी क्रिडा शिक्षक योगेश सोनवणे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास कार्याध्यक्ष सुर्यकांत लाहोटी यांचेसह पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन किर्ती चौधरी यांनी तर आभार कामिनी साळुंखे यांनी मानले.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!