Type to search

जळगाव शैक्षणिक

बी.यू.एन.रायसोनी शाळेत कागदी वस्तू बनविण्याची कार्यशाळा (फोटो गॅलरी)

Share

जळगाव । प्रतिनिधी

येथील बी.यू.एन.रायसोनी मराठी शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शालेय जीवनात प्राप्त व्हावी या हेतूने कार्यानुभव विषयांतर्गत कागदी वस्तू बनविण्याची कार्यशाळा आयोजीत केली होती. या कार्यशाळेत बालवाडी ते इ.8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षकांसह सर्व वर्ग शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना कागद कलेचे शिक्षण देत कागदापा

सून विविध वस्तू तयार करण्याचे धडे दिले. कागदापासून आकाशकंदील, वॉलपीस, झुंबर टोपी, सीडी, गुलाबपुष्प आदी वस्तू तयार करून दाखविल्या.

त्यांची अत्यंत सोप्या पद्धतीने कृती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्याने विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा कलाकृती करून अनेक मनमोहक कागदी वस्तू बनविल्या. या सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंदांचे शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी कौतुक केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!