Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ऊस वाहतुक करणार्‍या बैलगाडीखाली सापडून वृध्दाचा मृत्यू

Share

इंदोरी (वार्ताहर)- ऊस वाहतुक करणार्‍या बैलगाडी खाली जाऊन एका शेतकरी वृध्दाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारीच्या सुमारास अकोले शहरातील खटपटनाका उतारावर घडली आहे. शिवराम रामचंद्र जाधव (वय 65) असे मृत शेतकर्‍यांचे नाव आहे. ते अकोेले तालुक्यातील आंबड येथील रहिवासी होतेे.

गुरुवारी आकोलेचा आठवठा बाजार असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहानांची रहदारी त्यात ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडी यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते मयत शिवराम जाधव हे आपले कामानिमित्ताने स्टेट बँकेकडे पायी चालत जात असताना अचानक पाठीमागून येणारी टायरगाडी बैलांना न आवरल्यामुळे त्यांच्या अंगावर आली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते रोडवर आपटले व गाडी थेट त्यांच्या पोटावरून गेली. अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!