Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

विहीरीत आढळले एकाच कुटूंबातील पाच जणांचे मृतदेह

Share

भुसावळ (प्रतिनिधी) –

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे एकाच कुटूंबातील पाच जणांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मृतदेहांमध्ये आई व चार मुली असे एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
एकाच कुटूंबातील पाचही जणांचे मृतदेह एकाच विहीरीत आढळून आल्याने या दुर्दैवी घटनेबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. आत्महत्या की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मृतांमध्ये आई- उज्वला बबन ढोके व मुली- वैष्णवी, दुर्गा, आरुषी, पल्लवी ढोके यांचा समावेश आहे.

याच कुटूंबातील बबन ढोके यांचाही महिन्याभरापूर्वी विष प्राशन करून मृत्यू झाला आहे. या घटनेस महिना होत नाही तोवर या कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने दु:खाचे सावट पसरले आहे. ही घटना नेमकी कशी घडली यामागचे मुख्य कारण काय याचा उलगडा पोलीस तपासाअंतीच समजेल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!