Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘पुन्हा आणुया आपले सरकार’ टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

Share

मुंबई : राज्यभरात प्रचारदौरे चालू असतांना बुलढाणा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. भाजप सरकारची टॅग लाईन असलेल्या ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ चा टी-शर्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने परिधान केलेला आहे.

दरम्यान राज्यभरात विविध पक्षांच्या प्रचारसभा चालू असून या सभांमध्ये शेतकऱ्यांनाही अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र, या प्रचाराच्या धामधुमीतच शेतकरी आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार दौरा आज बुलढाणा जिल्ह्यात असून आज सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला. शेगाव तालुक्यातील खातखेड इथं हि घटना घडली. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे ( ३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!