Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वेळीच इमारत रिकामी केल्यानेच टळली मोठी हानी; पंचवटीत तीन मजली इमारत कोसळली

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या महिन्यातच धोकादायक असलेली पंचवटी परिसरातील इमारत रिकामी करून घेतल्यामुळे मोठी हानी टळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरु आहे. येथील पंचवटीतील हेमकुंज परिसरात ही तीन मजली इमारत कोसळली.

शहरातील मखमलाबाद नाक्यावरील मधुबन कॉलनीजवळ ही इमारत होती. इमारत जीर्ण झाल्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना गेल्या महिन्यात इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, इमारतीत कोणीही राहत नसल्याने कुठलीही हानी झाली नाही. मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे सकाळच्या सुमारास बघ्यांची मोठी गर्दी याठिकाणी जमलेली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!