Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वडनेर खाकुर्डीत शेतकऱ्याची जाफर म्हैस चोरीला; गुन्हा दाखल

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा डोळा शेतकऱ्याच्या कांद्यावर आहे. कळवण तालुक्यातून एक लाखांचा साठवणूक केलेला कांदा चोरीला नेल्याची घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील एका वयोवृध्द शेतकऱ्याची दावणीला बांधलेली जाफर (जाफराबादी) जातीची म्हैस चोरून नेल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याची चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

नथू काळू वाघ (वय ७६, रा. अजंग शिवार) यांचा शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांचा उदरनिर्वाह दुध विक्रीतून होतो. अशातच त्यांची दुध देती म्हैस चोरीला गेल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. २३) मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने  दावणीला बांधलेली काळ्या रंगाची म्हैस चोरून नेली. या घटनेत शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आधीच उन्हाळ्यात चाऱ्यासाठी जीवाचे रान करून जनावरांना वाढवले. आता कुठे पावसापाण्याने दिलासा दिला मात्र, दावणीची म्हैस चोरीला गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियमित घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!