Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : भाऊबीजेच्या दिवशी लावली जाते रेड्यांची झुंज; गवळी समाजाची अनोखी परंपरा

Share

मनमाड | प्रतिनिधी

राज्यात दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात मनमाड शहरात गवळी समाजाची इतर परंपरा पैकी एक पाडव्याला रेड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर भाऊबीजच्या दिवशी त्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही आज ही परंपरा पाळत गवळी समाज व शहर दुध संघा तर्फे  रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दिन दिन दिवाळी….गाई- म्हशी ओवाळी अशी म्हण प्रचलित आहे. पशुधनाची पूजा करून त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. मनमाड शहरात पाडव्याच्या दिवशी गवळी बांधव आपल्या रेड्याला आकर्षक पद्धतीने सजवून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढून त्याला देवदर्शनाला घेऊन आले होते. रेड्यांच्या पाठीवर दुष्काळी परिस्थिती सोबत पाणी अडवा-पाणी जिरवा असे संदेश देणारे चित्र रेखाटण्यात आले होते.

आज भाऊबीजच्या दिवशी शहरातील दरगुडे मैदानावर रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील गवळी बांधव रेडे घेवून आले होते. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. जोपर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही तो पर्यंत आमची दिवाळी साजरी होत नाही असे गवळी बांधव सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!