बजेट स्मार्टफोन रिअलमी 6 आणि रियलमी 6 प्रो बाजारात दाखल

jalgaon-digital
3 Min Read

नवी दिल्ली :

गुरुवारी म्हणजेच 5 मार्चला रिअलमी 6 आणि रियलमी 6 प्रो स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत. रिअलमी 6 प्रथम 11 मार्च रोजी विक्रीसाठी देण्यात येणार आहे. आणि रिअलमी 6 प्रो प्रथमच 13 मार्च रोजी उपलब्ध होणार आहे. आता रिअँँलिटी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर हि माहिती जाहीर केले आहे. की, रिअलमी सीरिजवर लवकरात लवकर एक्सेस विक्री होणार आहे. ट्विटनुसार, स्मार्ट फोन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहक काही रक्कम जमा करून 10 मार्च पूर्वी हा फोन बुक करू शकतात.

ज्याना सर्व प्रथम रियलमी 6 किंवा रियलमी 6 प्रो सहजतेने मिळेल याची खात्री करायची असेल तर त्यांनी 3,000 रुपये जमा करून फोन राखून ठेवू शकतात. या ऑफरचा शेवटचा दिवस 10 मार्च आहे. रक्कम जमा केल्यानंतर त्यांना फोनची उर्वरित रक्कम (म्हणजेच 3000 रुपये कमी) रियलमी किंवा रियलमी प्रोच्या पहिल्या सेलमध्ये भरावी लागेल.

आपणास रियलमी 6 विकत घ्यायचे असेल तर 11 मार्च ते 15 मार्च दरम्यान तुम्हाला थकबाकी भरावी लागेल. त्याच प्रमाणे तुम्हाला जर रियलमी 6 प्रो खरेदी करायची असतील तर तुम्हाला 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान संपूर्ण पैसे भरावे लागतील. एकदा संपूर्ण देयक दिल्यानंतर, फोन तीन दिल्यानंतर वितरण होईल. माधव सेठ यांच्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, ग्राहकांना रियलमी अ‍ॅक्सेसरीजवरही काही ऑफर मिळतील.

भारतात रिअलमी 6, रिअलमी 6 प्रो ची किंमत

भारतात रिअलमी 6ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. ह्या किंमतीत 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट देखील आहे, ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. रियलमी 6चा हाय-एंड 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्याय भारतात 15,999 रुपये किंमतीत लाँच करण्यात आला आहे. याशिवाय रिअलमी 6 फोन कॉमेट ब्लू आणि कॉमेट व्हाईट कलरच्या पर्यायांमध्ये विकले जातील.

भारतात रियलमी 6 प्रो ची किंमत 16,999 रुपये पासून सुरू होते, ज्यामध्ये ग्राहकांना फोनचा बेस व्हेरिएंट मिळेल. या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. त्याच वेळी, त्याच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्यायांची किंमत अनुक्रमे 17,999 आणि 18,999 रुपये आहे. कंपनीने लाइटनिंग ब्लू आणि लाइटनिंग ऑरेंज रंगांच्या पर्यायांसह रियलमी 6 प्रो सादर केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *