Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 'या' तारखेपासून; फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेपासून; फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

मुंबई | Mumbai

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत…

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात पार पडली. यावेळी या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.

‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं; म्हणाले…

दरम्यान, यावेळी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असल्याचे ठरले असून एकूण चार आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. तर ९ मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Shraddha Murder Case : “केस अन् चेहऱ्यासाठी ब्लो टॉर्च वापरला तर, हाडे…”; श्रद्धा हत्याकांडाबाबत आफताबचा धक्कादायक खुलासा

- Advertisment -

ताज्या बातम्या