Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत…

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्प हा संतुलित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मध्यमवर्गीयांसह महिला, युवक, दारिद्य्ररेषेखालील कुटुंब या सर्वांसाठी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंक्लप योग्य असून, तो समतोल आहे. या अर्थसंकल्पात प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतानाच जीडीपीचा ग्रोथ कसा होईल, याकडेही लक्ष ठेवण्यात आले आहे. महिलांना मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून त्यांचा व्यवसायातील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. 45 लाखांपर्यंतच्या घराच्या गुंतवणुकीसह छोट्या घरांवरही सवलत देण्यात आली आहे. या शिवया प्रत्येक घराला गॅस आणि विद्यूत जोड देण्याचे उद्दीष्टही ठेवण्यात आले आहे. परदेशी गुंतवणुकीला मुभा दिल्यामुळे उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार आहे.
– अरविंद पारगावकर,
सरव्यवस्थापक, लार्सन अ‍ॅड टुब्रो

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प न्यू इंडियाच्या दिशेने मोदी सरकारचे दमदार पाऊल, असे म्हणावे लागेल. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मंत्री पीयूष गोयल यांनी प्राप्तीकर मर्यादा पाच लाख केली. त्यात या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात न आल्याने मध्यमवर्ग समाधानी आहे. कृषी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करणे, बेघरांना घर देण्यासाठी महत्वाकांक्षी कार्यक्रम, देशात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी भरगोस तरतूद, महिला सक्षम करण्यासाठी नव्या योजना, अहमदनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र जल मंत्रालय निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्याची परिपूर्तता अर्थसंकल्पात झाली आहे. भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेने सुरू असल्याचे यावरून दिसून येते.
– प्रा. भानुदास बेरड,
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळाला सुरुवात करताना सादर केलेला पहिला अर्थसंकल्प सर्वसमावशेक व सशक्त भारताच्या उद्दिष्टाकडे नेणारा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेल्या निर्मला सीतारामन यांनी मिळालेल्या संधीचे सोने करीत अभ्यासपूर्ण आणि एकूणच अर्थकारणाला, विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात परवडणारी घरांच्या निर्मितीला व खरेदीला चालना देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
युवक, महिला, नवउद्योजक, व्यापारी, शेतकरी अशा सर्वच घटकांना समावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कर रचना सहजसोपी करण्यासाठी पावले उचलली आहेत. आता एखाद्याकडे पॅन कार्ड नसले तरी आधार कार्डच्या आधारे ते आयकर रिर्टन भरू शकतात. नावीन्यपूर्ण अशा ई-असेसमेंटची संकल्पनाही प्रत्यक्षात उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे आयकर विवरण पत्र तसेच अन्य अडचणी, त्रुटींचे केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन निराकरण होईल. बँकिंग क्षेत्रासाठी अनेक चांगली पावले सरकारने उचलली आहेत.
– सीए अजय मुथा,
चेअरमन, अहमदनगर मर्चंट्स को-ऑप.बँक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!