Type to search

Breaking News देश विदेश मार्केट बझ मुख्य बातम्या

आता पॅन कार्ड नसल्यास आधारद्वारे भरा ‘आयटी रिटर्न’

Share

नवी दिल्ली : नुकताच मोदी सरकारने budget २०१९ सादर केले. यामध्ये भारतीय चलनापासून आणि युवकांपर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या अर्थसंकल्पात एक महत्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे आता इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर आधारकार्डही ग्राह्य धरले जाणार आहे.

या निर्णयामुळे पॅन कार्ड नसलेल्या लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अडचण येत होती, त्यांच्यासाठी हा दिलासादायक निर्णय आहे.

भारतातील जवळपास ८० कोटीच्या आसपास आधारकार्ड धारक आहेत. तसेच आधारकार्ड बँकेशी संलग्न करण्यात आले आहे. परंतु इन्कम टॅक्स संदर्भात फाईल करण्यासाठी पण कार्ड नसल्याने अडचण येत होती. परंतु आता पण कार्ड नसलेल्यांसाठी आधारकार्ड उपयोगी ठरणार आहे.

त्यामुळे आपण पॅनकार्ड आणि आधारकार्ड यांची अदलाबदल केली असून आता ज्यांच्याकडे पॅनकार्ड नसेल ते आधारकार्डच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करु शकतात, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

अलीकडेच इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आता आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक गरजेचे असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!