पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद

0

श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये हाकनाक आपल्या नागरिकांचे आणि जवानांचे बळी जात आहेत.आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानने बीएसएफ पोस्ट आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य केलं असून त्यांच्यावर मोर्टार डागायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही जशास तसे उत्तर देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना कालच घडली होती. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तुफान गोळीबार केला होता. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता.

LEAVE A REPLY

*