Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या'निरमा गर्ल'च्या पोस्टरने अमित शाहांचं हैदराबादमध्ये स्वागत; पोस्टरवर नारायण राणेंसह अर्जुन खोतकरांचंही...

‘निरमा गर्ल’च्या पोस्टरने अमित शाहांचं हैदराबादमध्ये स्वागत; पोस्टरवर नारायण राणेंसह अर्जुन खोतकरांचंही नाव… नेमकं प्रकरण काय?

हैदराबाद | Hyderabad

केंद्रीय गृहमंत्री आज हैदराबाद दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यादरम्यान शहांच्या स्वागताच्या एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘निरमा गर्ल’च्या पोस्टरने अमित शाहांचं स्वागत करण्यात आलं आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये गृहमंत्र्यांचा फोटो कुठेच दिसत नाही. पोस्टरमध्ये निरमा मुलीच्या फोटोसह भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा, नारायण राणे, सुवेंदू अधिकारी, ईश्वरप्पा, ज्योतिरादित्य सिंधिया इत्यादींची नावे आहेत. हे सर्व नेते इतर पक्षांतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल

पोस्टरवर इंग्रजीत ‘वॉशिंग पावडर निरमा’ आणि खाली ‘वेलकम टू अमित शाह’ असे लिहिले आहे. तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने हे पोस्टर्स लावले आहेत.

दरम्यान शनिवारी (11 मार्च) ईडीने तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस नेते के चंद्रशेखर राव (केसीआर) यांची मुलगी कविता यांची नवी दिल्लीत सुमारे 9 तास चौकशी केली. दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणात ईडीने कविता यांची चौकशी केली आहे.

गोदावरीत चार तरुण बुडाले; एकाचा मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु

दरम्यान दिल्लीतील राज्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता (K Kavitha) यांची चौकशी सुरू आहे. कालही तेलंगणात झळकलेल्या अनेक पोस्टर्सद्वारे भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये विविध पक्षांचे नेते दाखवण्यात आले आहेत, ज्यांच्यावर भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही तपास यंत्रणेने छापेमारी केलेली नाही.

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? महिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं अन्…

पोस्टरच्या माध्यमातून केसीआर यांच्या बीआरएसने (Bharat Rashtra Samithi) भाजपावर हल्लाबोल करण्यात आला आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर कोणताही डाग नसल्याचे तसेच छापेमारीही होत नसल्याचे या पोस्टरवर एका बाजूस दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, बीआरएस आमदार कविता यांना दाखविण्यात आले असून त्यांना स्वच्छ प्रतिमा असल्याचे म्हटले आहे.

रंग खेळण्याच्या बहाण्याने फॉरेनरसोबत अश्लील वर्तन, Video Viral

- Advertisment -

ताज्या बातम्या