वारी पुलावरून डंपर नदीत कोसळला

0
कान्हेगाव (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील वारीच्या गोदावरी पुलावरून कोळश्याची राख वाहणारा रिकामा डंपर नदीत पडला. मात्र दैव बलवत्तर म्हणून चालक शिंदे व रोकडे या दोघांचेही प्राण वाचले.
गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामानुसार चालक दत्तात्रय शिंदे व बाळासाहेब रोकडे हे दोघे डंपर घेऊन वारीच्या गोदावरीच्या पुलावरुन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने डंपर पाण्यात सरकल्याने नदीत पडला.
बुधवारी सर्वत्रच मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे वारी येथील पुलावरून पाणी वाहत होते. तरीही डंपर चालकाने पूलावर नेल्यामुळे तो खाली सरकला. थोडा नदीत वाहत गेला परंतु सुदैवाने नदीत अडकला गेल्याने दोन्ही चालकासह पूर्णतः पाण्यात बुडाला. सुदैवाने चालक शिंदे व रोकडे हे दोघे डंपरच्या आतमधुन तात्काळ बाहेर येऊन डंपरच्या छतावर उभे राहीले.
नंतर ही बातमी वार्‍यांसारखी गावात पसरली व ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीला धावुन आले व लांब दोरीच्या सहाय्याने त्यांना पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. हा पुल अतिशय कमी उंचीचा आहे. या पुलावरून शिंगवे, सडे येथून नागरीकांची व विद्यार्थ्यांची ये जा असते.
अतिशय धोकादायक हा पुल झालेला आहे. कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील नागरिकांना शिर्डी, राहाता, श्रीरामपूरकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. या पुलाची उंची वाढविण्या संदर्भात अनेक वर्षे सरकारकडे या भागातील पुढारी मागणी करीत असुन त्याकडे कोणीही लक्ष देत नाही असे दिसते.

LEAVE A REPLY

*