Type to search

Featured जळगाव

पिंपळगाव खुर्द : रोटाव्हेटरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

Share

पहूर, ता.जामनेर – वार्ताहर

शेतात पेरणीपुर्व मशागतीचे काम सुरू असताना रोटाव्हेटर यंत्रात अडकून जखमी झालेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दि.२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पिंपळगांव खुर्द येथे घडली.

सध्या शेत शिवारात पेरणी पुर्व मशागतीची कामे सुरू आहेत, पिंपळगांव खुर्द येथील अमोल रामदास जवखेडे यांच्या शेतात ट्रॅक्टर-रोटाव्हेटरच्या सहाय्याने शेती तयार करण्याचे काम सुरू होते.

दि.२o मे रोजी मुन्ना राजू भिलखेडे (वय-३५) हे रोटाव्हेटर यंत्र चालवित असताना ठिबक सिंचनची नळी यंत्रात अडकली. ती नळी बाजूला करण्याच्या प्रयत्नात द्रॅक्टर चालक मुन्ना भिलखेडे खाली कोसळले आणि रोटाव्हेटर यंत्रात अडकले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास तातडीने जळगाव येथे खासगी रुग्णालायात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!