Type to search

Featured जळगाव

रावेर : न्यायालयाच्या आवारात कारण नसताना भटकंती करणाऱ्या आठ जणांवर कारवाई

Share

रावेर | प्रतिनिधी –

देशभरात कलम १४४ लागू असतांना रावेर न्यायालयात कारण नसतांना भटकत असलेल्या ८ जणांवर पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे लॉकडाऊन चालू असताना तसेच कलम १४४ (२)सीआरपीसी लागू असतांना शे.शकील शे. गुलाम,शेख समीर शेख खालील, रईस बेग अकबर बेग, शेख खालील शेख बिस्मिल्ला सर्व रा.मदिना कॉलनी,रावेर.शेख सुपडू शेख महेबूब रा.फतेह नगर, रावेर, शेख सलमान शेख कय्युम, शेख लतीफ शेख समद रा.उटखेडा रोड रावेर.शेख वसीम शेख इस्माईल रा. मदिना कॉलनी हे आठ जण रावेर न्यायालयात विनाकारण भटकंती करत असल्याने न्यायाधीश आर एल राठोड, न्यायाधीश आर एम लोळगे यांच्या आदेशावरून कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

यापूर्वी कलम १८८ प्रमाणे दाखल झालेले एकूण ५ आरोपींना हजर केले असता प्रत्येकी एक हजार-रुपये दंड करण्यात आला आहे, दंड न भरल्यास १ महिना शिक्षा ठोठावण्यात आली आहे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!