Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरावेर : मुलाच्या अपघाती निधनानंतर मानसिक धक्याने आईचा मृत्यू

रावेर : मुलाच्या अपघाती निधनानंतर मानसिक धक्याने आईचा मृत्यू

रावेर | प्रतिनिधी

निंभोरा (ता.रावेर) येथील भास्कर महाले यांचा मुलगा सुधीर सोमवारी सायंकाळी फैजपूर येथून अमळनेरला पत्नीला आणण्यासाठी जात असतांना धानोऱ्याजवळ कारचा अपघात होवून यात मृत्यमुखी पडल्याने,मंगळवारी निंभोऱ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या मृत्यूने मानसिक धक्का बसलेली आई सौ.मंगला भास्कर महाले (वय ५५) यानंतर बेशुद्ध पडल्याने बुधवारी सकाळी तातडीने सावदा डॉ.सुनील चौधरी येथे उपचाराकरिता हलवण्यात आले होते, उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -

निंभोरा येथील मूळ रहिवासी असलेले भास्कर महाले फैजपूर येथे स्थायिक झाले आहे. त्यांचा मुलगा सुधीर जळगाव येथे कुरिअर व्यवसाय करत होते, लॉकडाऊन झाल्याने ते फैजपूर येथे आले होते. त्यांची पत्नी अमळनेर येथे माहेरी असल्याने, माहेराहून पत्नीला आणण्यासाठी सोमवारी सायंकाळी सुधीर महाले त्यांच्या स्विफ्टकारने निघाले होते. प्रवासात बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील धानोरा येथे यश हॉटेलजवळ वळणावर त्यांचा जोरदार अपघात होवून त्यांचा मृत्यू झाल्याने मंगळवारी त्यांच्यावर निंभोरा (ता.रावेर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पुत्राच्या निधनाने मानसिक धक्का बसलेल्या आई मंगला महाले बेशुद्ध पडल्या, त्यांना सावदा येथे उपचारासाठी दाखल केले असता बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याने निंभोरा येथे शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या