Type to search

Featured जळगाव मुख्य बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवड मधील शाळा बंद

Share

मुंबई

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये करोना संसर्ग झालेले संशयीत रूग्ण आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये आजपासून पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

मात्र तेथील दहावीच्या परीक्षा सुरू राहणार आहेत. तसेच मुंबईतील शाळा, महाविद्यालयेही सुरू राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरळीत होणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विधानसभेत घोषणा केली.

नागरीकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरीकाने स्वात:च्या शरीरासह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!