ST strike :संपकरी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी

ST strike :संपकरी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees strike) बुधवारी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) यासंदर्भात सुनावणी झाली होती. परंतु या सुनावणी दरम्यान कोणताही तोडगा निघाला नाही. पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी निश्चित केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आता कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी देण्यात आली आहे. कामावर रुजू न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांची आजपासून बडतर्फी करण्यात येणार आहे.

ST strike :संपकरी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी
शिक्षणमंत्र्याची माहिती : शाळा पुन्हा बंद होणार?

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मुद्दावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आज अंतिम मुदत दिली आहे. कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास उद्यापासून त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. नियमानुसार निलंबन, बडतर्फीसारख्या कारवाईला उद्यापासून सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

बुधवारी उच्च न्यायालयाने एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी कोर्टाच्या आदेशाच्या अवमानाबाबतची माहिती सर्व २५० डेपोंमध्ये नोटीस लावून माहिती देण्याची सूचना केली. तसेच कोर्टाचे आदेशाची प्रतही लावण्याच्या सूचना केल्या. तसेच कोर्टाच्या आदेशाची प्रत मराठी-हिंदी वृत्तपत्रांमध्येही छापून आणण्याचे आदेश कोर्टानं राज्य शासनाला दिले.

एसटी महामंडळाला आदेश

जे कामगार कामावर येण्यास इच्छूक आहेत, त्यांची वैद्यकीय चाचणी करुन त्याचा अहवाल जमा करुन संबंधित कामगाराला कामावर रुजू करुन घेण्यात यावं. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टाने एसटी महामंडळाला दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com