पिंपळगाव ब. ग्रामपंचायत निवडणुकीच्या बहिष्कारास्त्रात नवीन 'ट्विस्ट'

पिंपळगाव ब. ग्रामपंचायत निवडणुकीच्या बहिष्कारास्त्रात नवीन 'ट्विस्ट'

नाशिक । विजय गिते | Nashik

निफाड तालुक्यातील (Niphad taluka) पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपंचायतचे (gram panchayat) नगरपरिषदेमध्ये (nagar parishad) रूपांतर व्हावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत थेट निवडणुकीवरच बहिष्कार (Boycott the election) टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी संपूर्ण जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर यामध्ये आता एक 'ट्विस्ट' आला आहे. मतदानावर (voting) सर्व पक्षीय बहिष्कार (All party boycott) टाकण्याचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर एका गटाने मात्र, याबाबत वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाची लवकरच बैठक होणार असून निवडणूक (election) लढवायची की नाही? यावर या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे.

गावाला रस्ता नाही, गावाला पिण्याच्या पाण्याची सोय (Drinking water facility) नाही, अशा विविध मुद्द्यांवरून सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशीच एक घटना जिल्ह्यात आता घडली असून पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत (nagar parishad) व्हावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतच्या निवडणुकीवरच थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन स्तरावर कुठलीही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी अशा प्रकारे बहिष्कारास्त्र उभारावे का लागते ? याचा विचार पिंपळगावकरांच्या या भूमिकेमुळे शासनाने करणे गरजेचे झाले आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये होण्यासाठी हे गाव सर्व निकषांमध्ये बसत असून देखील अशा प्रकारचा बहिष्कार नागरिकांना टाकावा लागतो आहे.

राज्यात सर्वाधिक म्हणजेच ७० हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत (gram panchayat) व राजकीय संवेदनशील असलेल्या पिंपळगावात महत्वाकांक्षी नेत्यांच्या राजकीय त्यागाच्या भूमिकेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरपरिषदेत रूपांतर करण्याचा शासनस्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहे. विकासकामाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे.

त्यासाठी महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय सहविचार सभेत बहिष्काराचा निर्णय झाला. पिपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक (election) दोन तीन दिवसांपूर्वी जाहीर झाली अन् इच्छुकांच्या महत्वाकांक्षांना धुमारे फुटले. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक झाली तर दोन-तीन वर्षात नगरपरिषदेत रूपांतर होणार नाही, हे ओळखून प्रमुख नेत्यांनी सहविचार सभा बोलवली.

त्यात आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar), माजी सरपंच भास्कर बनकर, भाजपचे मोरे, पाटील यासह बाळासाहेब आंबेकर यांनी गावच्या विकासासाठी राजकीय महत्वकांक्षा दूर ठेवून बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्णय घेतला. जर कुणी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला तर गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत इच्छुकाला थांबविण्याचे ठरले आहे. सन २००७ मध्येही असाच समझोता होऊन बिनविरोध निवडणुकीचा (Uncontested election) चमत्कार पिंपळगावाटच घडलेला आहे.पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय बहिष्काराच्या माध्यमातून झाला आहे.

बहिष्काराचे अस्त्र चालणार की होणार बोथट ?

मात्र, यामध्येही आता एक 'ट्विस्ट' आला आहे. सहविचार सभेत सहभागी एका गटाने आता ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. यासाठी बैठकही बोलाविली असून त्यात कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे.एका गटाला निवडणुकीत राजकीय तोटा होणार असल्यामुळेच निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय होय. त्यामुळे दुसऱ्या गटाने याचा राजकीय फायदा उठवण्याचा विचार केला असून त्यातूनच बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.यामुळे निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र चालणार की बोथट होणार ? हे आज उद्याच कळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com