धरणांतील जलसाठा ९५ टक्के ; १४ धरणे शंभर टक्के भरली

धरणांतील जलसाठा ९५  टक्के ; १४ धरणे शंभर टक्के भरली

धरणांतील जलसाठा ९५ टक्के ; १४ धरणे शंभर टक्के भरली

नाशिक । प्रतिनिधी

वरुणराजाने सप्टेंबरमध्येही आभाळमाया कायम ठेवली असून जिल्ह्यातील धरणे तुडूंब भरली आहे. जिल्ह्यातील २४ धरणांत मिळून ९५ टक्के इतका मुबलक जलसाठा आहे. १४ धरणे शंभर टक्के भरली आहे.गतवर्षी आजमितीला धरणांत ९९ टक्के जलसाठा होता. राज्यात आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. ते बघता लवकरच सर्व धरणे शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत.

यंदाच्या हंगामात जून व जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने जिल्हावासियांची झोप उडाली होती. नाशिकची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणांत ५० टक्क्यांहून कमि जलसाठा होता. नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट होते. पाऊस नसता पडला तर शहरासह जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट घोगावत होते. पण आॅगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांतील जलसाठ्यात दमदार वाढ झाली. सप्टेंबरमध्येही वरुणराजाने जोरदार हजेरी कायम ठेवली आहे. त्यामुळे धरणे तुडूंब भरली आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये ९५ टक्के जलसाठा आहे. गंगापूर, दारणा, मुकणे, गिरणा यांसह १४ धरणे शंभर टक्के भरुन अोव्हर फ्लो झाली आहेत. दारणा, गिरणा व नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून मोठया प्रमाणात विसर्ग सुरु आहे. धरणांची एकूण पाणी क्षमता ६५ टीएमसी असून सद्यस्थितीत ६२ हजार ७३८ टिएमसी इतका जलसाठा आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास धरणे शंभर टक्के भरतील. गतवर्षी आजमितिला धरणांत ९९ टक्के जलसाठा होता.

धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारित)

गंगापूर - १००

कश्यपी - ७५

गौतमी गोदावरी - ८७

आळंदी - १००

पालखेड - ९८

करंजवण- ९०

वाघाड - ९७

अोझरखेड - ८०

पुणेगाव -९७

तिसगाव - १००

दारणा - ९८

भावली -१००

मुकणे - ८३

वालदेवी- १००

कडवा - १००

नांदूरमध्यमेश्वर - ७९

भोजापूर - १००

चणकापूर - ९८

हरणबारी - १००

केळझर - १००

नागासाक्या - १००

गिरणा - १००

पुनद -९८

माणिकपुंज - १००

एकूण ९५

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com