मोठी बातमी : कोरोनाच्या या औषधाला मिळाली मंजुरी

मोठी बातमी : कोरोनाच्या या औषधाला मिळाली मंजुरी

नवी दिल्ली

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना दिलासा देणारी मोठी बातमी आली आहे. भारत सरकारच्या 'ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' (DCGI) ने कोरोनावरील औषधास मंजुरी दिली आहे. Zydus कंपनीचे Virafin हे औषध कोरोनावरील उपचार असणार आहे.

Title Name
प्रवास करायचा आहे? मग ई-पास लागणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया
मोठी बातमी : कोरोनाच्या या औषधाला मिळाली मंजुरी

जायडस कंपनीने दावा केला की, Virafin या औषधाच्या चाचणीचे निष्कर्ष परिणामकारक आले आहे. हे औषध वापल्यानंरत ७ दिसवास ९१.१५ कोरोना रुग्णांची RT-PCR चाचणी नेगेटिव्ह आली आहे. औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असं कंपनीने सांगितले. एंटीवायरल ड्रगचा वापरामुळे कोरोना रुग्णावर सकारात्मक परिणाम मिळत आहे.

कंपनीने दावा केला की, कोरोना झाल्याच्या प्राथमिक स्टेजला Virafin दिले गेल्यास ते रुग्ण कोरोनातून बरे होत आहे. परंतु हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रुग्णांना देण्यात येणार आहे.

झायडूस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा - 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin या अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे.

झायडूस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी. हिपेटायटिस सी साठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. 10 वर्षांपूर्वी या यकृतासंबंधी आजारावर उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती. आता हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com