जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूकीत 'सहकार' पॅनलचा विजय

सत्तांंतर घडवत ' सहकार ' पॅनलची 'आपला 'वर पंधरा शून्यने मात
जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूकीत 'सहकार' पॅनलचा विजय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची बिनविरोधाची हॅटट्रीक हुकल्यानंतर सत्ताधारी 'आपला' व विरोधकांच्या 'सहकार' पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सहकार पॅनलचे नेते प्रमोद निरगुडे रवींद्र आंधळे व रवींद्र थेटे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 15 जागा वर विजय मिळवत पतसंस्थेवर सहकार पॅनलचा झेंडा फडकवला आहे.

  सत्ताधारी आपला पॅनलचे नेते विजयकुमार हळदे यांच्या पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. सभासद मतदारांसमोर सहकार पॅनलने आपली बाजू मांडत मतदारांना परिवर्तनाची हाक दिली. यामध्ये सभासद मतदारांनीही सहकार पॅनलला साथ देत आपला पॅनलचे नेते हळदे यांच्यावरील रोष व्यक्त केल्याची भावना सहकार पॅनलच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रविवारी (दि.६) पंधरा जागांसाठी नाशिकमध्ये मराठा हायस्कूल, गंगापूर रॉड येथे सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी चार वाजता मतदान संपल्यानंतर याच ठिकाणी पाच वाजेला मतमोजणीस प्रारंभ झाला.हळूहळू करत सहकार पॅनलचे नेते हे विजयाकडे घोडदौड करत होते. विजय समीप दिसताच सहकार पॅनलच्या नेते,कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत फटाक्यांचे आकाशबाजी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे. कंसात त्यांना मिळालेली मते

सर्वसाधारण गट - सचिन अत्रे(५९६), अमित आडके(७१८), रविंद्र थेटे(६६९), रंजन थोरमिसे(६४४), नितीन पवार(७२४), चंद्रशेखर पाटील(६२३), सचिन पाटील(६७७),

तालुका प्रवर्ग - किशोर अहीरे(६७४), गणेश गायकवाड(६५६), नंदकिशोर सोनवणे(७५२),

इतर मागासवर्ग प्रवर्ग - विक्रम पिंगळे(७०९),

विमुक्त जाती जमाती प्रवर्ग - अनिल दराडे(७१३),

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग - मंगेश जगताप(६८२),

महिला राखीव प्रतिनिधी गट - अर्चना गांगोडे(६५८), सरिता पानसरे (५२९)

आपला पॅनल

सर्वसाधारण गट - भाऊसाहेब गांगुर्डे(३२८), ज्ञानेश्वर गायकवाड(३५७), रोहीदास जाधव(३३३), दिनेश टोपले(३४०), कानिफनाथ फडोळ(३६८), योगेश बोराडे(३३२), दिनकर सांगळे(३२९)

तालुका प्रवर्ग-  बापुसाहेब आहिरे(३३१), प्रविण कांबळे(३३९), विनय जाधव(२९९),

इतर मागास प्रवर्ग - प्रकाश थेटे(३९५)

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग -प्रदिप अहिरे(३७३)

विमुक्त जाती जमाती प्रवर्ग - संदिप दराडे(३६७),

महिला प्रवर्ग- संगिता ढिकले(३०३), सुमन पाटील(२५२)

मनमानी कारभाराला चपराक

दहा वर्षापासून पतसंस्थेमध्ये काही पदाधिकारी मनमानी कारभार करत होते व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. त्याची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. निवडणूक लागल्यापासून सहकार पॅनलच्या बऱ्याच सहकाऱ्यांना धमकविण्यात आले. त्याचा सुद्धा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जिल्हा परिषद नाशिक मधील लिपिक वर्गीय कर्मचारी आरोग्य संवर्गीय कर्मचारी लेखा विभाग अभियंता परिचर या सर्व या सर्व संवर्गांनी मिळून सहकार पॅनेल करण्यात आला. सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार हे अत्यंत सुशिक्षित व अभ्यासू असल्याने व सहकार पॅनल चा जाहीरनामा हा सर्व सभासदांना सभासदांना सहमत असल्यामुळे त्यांनी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड निवडून दिले.पॅनलचे नेते रवींद्र आंधळे, बाळासाहेब ठाकरे,विजय देवरे, मंदाकिनी पवार, रवींद्र थेटे, ऋषिकेश गरुड, विलास शिंदे, जी.पी. खैरनार,या सर्व नेत्यांची मेहनत असून सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड काम केल्यामुळे हा विजय झाला

-प्रमोद निरगुडे, नेते,सहकार पॅनल.

पराभव मोठ्या मनाने मान्य

  पतसंस्था निवडणुकीत "आपला पॅनल" च्या युवा उमेदवारांसाठी आपापल्या पद्धतीने मेहनत घेऊन मदत केली.यश अपयश चालू असते. आपल्या पॅनलमध्ये आरोग्य विभाग व अभियंता विभागाचे उमेदवार नसल्याने पर्यायाने पराभवाला सामोरे जावे लागले. मी व माझे सर्व मित्र परिवार हा पराभव मोठ्या मनाने मान्य करत आहे.नवनिर्वाचित सर्व संचालकांचे मन:पूर्वक अभिनंदन. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा.

- विजयकुमार हळदे,नेते,आपला पॅनल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com