निधीसाठी जि.प.सदस्य आक्रमक

मुख्यालयात उद्या आंदोलन
निधीसाठी जि.प.सदस्य आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला Nashik Zilla Parishad पंधराव्या वित्त आयोगाचा 32.80 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वाटप distribution of Funds सदस्यांना समान करण्याऐवजी असमान वाटप झाल्याच्या तक्रारी आहेत. सदस्यांकडून 36 लाखांचे पत्र देऊन निधी दिला असला तरी, ठराविक सदस्यांना अतिरिक्त निधी दिला आहे.

या असमान निधी वाटपाची सदस्यांमधील खदखद उफाळून आली आहे. निधी वाटपात अन्याय झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी थेट अध्यक्षां विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी 11 वाजता जि.प. मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोर सदस्य उपोषण व आंदोलन करणार आहेत.

पंधराव्या वित्त आयोगाच्या 32.80 कोटी निधीचे नियोजन करताना सुरवातीला मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे अडचणी आल्या. या निधी नियोजनाची सदस्यांकडून सर्वसाधारण व स्थायी समिती बैठकांमध्ये ओरड झाली. अखेर सदस्यांचा दबाव वाढल्यामुळे अध्यक्ष कार्यालयातून सदस्यांना फोनव्दारे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 36 लाख रुपयांच्या निधीतून कामांचे प्रस्ताव मागविण्यात आले.

बहुतांश सदस्यांनी कामांचे प्रस्ताव सादर केले. त्यात बंधित व अबंधीत निधीतील कामे याबाबत खेळ रंगला. त्यामुळे पुन्हा पत्रे मागविण्याची नामुष्की आली. आता सदस्यांनी ठरल्याप्रमाणे पत्र दिले आहेत. प्रत्येक सदस्याला 36 लाखांने निधीचे वाटप झाल्याने केवळ 26 कोटींच्या निधीचे नियोजन झाले आहे. उर्वरित निधीचे 7 कोटींच्या निधीचे काय ? असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केला होता.

मात्र, यास उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. मात्र, दुसरीकडे निधी वाटपात पदाधिकारी व ठराविक खास मर्जीतील सदस्यांना वाढीव निधी दिल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. या सदस्यांना 36 लाखांव्यातिरिक्त अधिकचा निधी दिला आहे. त्यामुळे निधी वाटपात अन्याय झाल्याची भावना सदस्यांमध्ये होती. सदस्यांमधील असलेली ही खदखद उफाळून आली.

विकास आराखडा नियोजनासाठी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर सदस्यांनी एकत्र येत निधी वाटपात अन्याय झाल्याचे सांगितले. यावर, सदस्यांनी एकत्रित माहिती घेतली असता काही सदस्यांना 40 लाख, काहींना 45 लाख तर, काहींना 50 ते 55 लाख दरम्यान निधींचे वाटप झाल्याचे समोर आले. समान निधी वाटपाचे सुत्र ठरलेले असताना असमान वाटप करत अन्याय केल्याने या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय आक्रमक झालेल्या सदस्यांनी यावेळी घेतला. यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप सदस्यांचा समावेश आहे.

निधीचे वाटप यापूर्वीचे होणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांनी ओरड केल्यानंतर याचे वाटप होत आहे. सर्वसाधारण सभेत निधीचे समान वाटप करण्याचे निश्चित झालेले असतानाही सदस्यांना असमान वाटप करण्यात आले आहे. हा सदस्यांवर अन्याय आहे.

सिमंतिनी कोकाटे, सदस्या, जिल्हा परिषद

Related Stories

No stories found.