जिल्हा परिषद आरक्षण सोडत जुलैत?

जिल्हा परिषद आरक्षण सोडत जुलैत?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission )जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट, गणरचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून 27 जूनला अंतिम प्रारूप आराखडे (Final draft plans )जाहीर होणार आहेत. प्रारूप आराखडे जाहीर झाल्यानंतर जुलै महिन्यात जिल्हा परिषदांचे गट व पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत ( Groups Reservation ) निघण्याची शक्यता आहे. या आरक्षणानंतर अध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2022 मध्ये राबवलेला गट-गण प्रारूप आराखडा कार्यक्रम रद्द केला आहे. तसेच नव्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारूप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यात आता गट-गणांचे प्रारूप आराखडे मान्यतेचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग आला आहे.

नवीन वेळापत्रकानुसार गट व गण प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम 23 मेपासून सुरू होऊन 27 जूनला अंतिम प्रारूप आराखडे जाहीर होणार आहेत. गट, गण झाल्यानंतर माजी सदस्यांसह इच्छुकांना आरक्षणाचे वेध लागतात. अंतिम प्रारूप आराखडे प्रसिद्ध झाल्यानंतर गटांचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाकडून काढले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने एससी व एसटी तसेच महिला राखीव गटाचे आरक्षण काढले जाईल.

जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये 11 गट वाढले आहेत. गट वाढल्याने तालुक्यातील आरक्षणात बदल होणार आहे. आतापर्यंत गत तीन ते चार निवडणुकीत गट आरक्षणाचा अभ्यास करून आरक्षण काढले जात असल्याने गटात कोणते आरक्षण राहील याचा अंदाज येत होता. मात्र आता गट वाढल्याने हे राजकीय अंदाज करणे शक्य होत नाही. यामुळे गटाचे आरक्षण महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर अध्यक्षपदाचे आरक्षण निघू शकते. आरक्षण निघाल्यानंतर खर्‍या अर्थाने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होईल.

Related Stories

No stories found.