जि.प.पंचायत समिती निवडणूक: 'या' तारखेला होणार प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

जि.प.पंचायत समिती निवडणूक: 'या' तारखेला होणार प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई । Mumbai

नाशिकसह राज्यातील २५ जिल्हा परिषदा (Zilla Parishad) व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग (Election Department) व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर २२ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिली आहे...

भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly constituency) मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून २२ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

तसेच त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या २९ जुलै २०२२ रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. तर मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा खालीलप्रमाणे

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com