Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधून आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

नाशिकमधून आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

नाशिक । Nashik

शिवसेना नेते (Shiv Sena leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला लागलेली गळती अजूनही कायम आहे. शिंदेसोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड (Rebel) केल्यानंतर आता १२ खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. या बंडखोरीमुळे शिवसेनेचे आतापर्यंत मोठे राजकीय नुकसान झाले आहे. यानंतर आता ठाकरे पितापुत्र खडबडून जागे झाले असून युवासेनाप्रमुख (Yuva Sena Cheif) आदित्य ठाकरे हे शिवेसेनेला नवी भरारी देण्यासाठी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रा (Shiv Sanvad Tour) काढणार आहेत…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) या शिवसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून (Nashik) होणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा दौरा २१ ते २३ जुलै यादरम्यान होणार असून या तीन दिवसांमध्ये ते उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पिंजून काढणार आहेत. तर या शिवसंवाद यात्रेचा नारळ भिवंडीतून फुटणार असून यानंतर भिवंडी (Bhiwandi) नाशिक(Nashik) दिंडोरी (Dindori) संभाजीनगर (Sambhajinagar) आणि शिर्डी (Shirdi) या ठिकाणी ही शिवसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचा बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात (Constituency) जाण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच याअगोदर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा (Nishtha Yatra) काढून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. याशिवाय आदित्य ठाकरे पुढे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र दौऱ्याचेही (Maharashtra Tour) नियोजन करणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या