Big Breaking : लग्नाला विरोध, नाशिकच्या तरुण-तरुणीचे गोव्यात विषप्राशन; पुढे घडले असे काही...

Big Breaking : लग्नाला विरोध, नाशिकच्या तरुण-तरुणीचे गोव्यात विषप्राशन; पुढे घडले असे काही...
breaking news

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याकारणाने नाशिक येथील एका जोडप्याने गोवा येथील एका हॉटेल मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती स्थिर असून ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील गौरव यादव (21) या तरुणाचे एका तरुणीसोबत (22) प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांकडून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते गेल्या आठवड्यात रेल्वेने नाशिकहून गोव्याला पोहोचले.

Big Breaking : लग्नाला विरोध, नाशिकच्या तरुण-तरुणीचे गोव्यात विषप्राशन; पुढे घडले असे काही...
गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

त्यानंतर त्यांनी किशोर अय्यर या बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पुरावा दिला. दि. ३१ ऑक्टोबरला रात्री त्यांनी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी दि. ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला व मुलीची तब्येत स्थिर असल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले.

Big Breaking : लग्नाला विरोध, नाशिकच्या तरुण-तरुणीचे गोव्यात विषप्राशन; पुढे घडले असे काही...
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

दरम्यान, घरच्यांचा लग्नाला प्रखर विरोध असल्याने आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी गोवा येथील कोलवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com