Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासावानात आजपासून युवा साहित्य महोत्सव

सावानात आजपासून युवा साहित्य महोत्सव

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या (Sarvajanik Vachanalaya Nashik )वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी यु’वा साहित्य महोत्सवा’चे ( Youth Literary Festival)आयोजन करण्यात आले आहे. साहित्य महोत्सवात युवा साहित्यिकांची पर्वणी असणार आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शनिवार (दि. 11)रोजी दुपारी एक वाजता युवा काव्य स्पर्धकांची नोंदणी व टोकन वितरण करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता काव्य स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. दिवसभर काव्य स्पर्धा सुरू राहणार आहे.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता युवा साहित्य महोत्सवाचे उद्घाटन बेंगलोर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्रा. डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली व वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सकाळी अकरा वाजता सुप्रसिद्ध ब्लोगर तन्वी अमित यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉग कसा लिहावा, याच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा व कार्यशाळेचा शुभारंभ होईल. दुपारी दीड वाजता प्रसिद्ध संवादक किरण सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल वाचन की ग्रंथ वाचन या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात अमोल चिनी, संकेत शिंदे, प्रतीक जोशी, प्राजक्ता नागपुरे, प्रिया जैन, अश्विनी भालेराव आणि मुग्धा थोरात सहभागी होणार आहेत. या परिसंवादात अनेक गोष्टींचे महत्त्वपूर्ण विवेचन केले जाणार आहे.

दुपारी तीन वाजता युवा काव्य स्पर्धकांची अंतिम फेरी होणार आहे आणि सायंकाळी पाच वाजता काव्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि वाचक चळवळ वृद्धिंगत करणार्‍या भिमाबाई जोंधळे आजींचा सन्मान सोहळा नवनिर्वाचित आ. सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

युवा साहित्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहकार्यवाह अ‍ॅड. अभिजीत बगदे, अर्थसचिव देवदत्त जोशी, ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, नाट्य सचिव सुरेश गायधनी, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, बाल भवन सचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, वस्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे व सदस्यांनी केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या