Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याभावली धरणात युवक बुडाला; शोधकार्य सुरु

भावली धरणात युवक बुडाला; शोधकार्य सुरु

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या ( Bhavli Dam )बॅकवॉटर परिसरात आंघोळीसाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. चार मित्रांच्या सोबत पोहत असतांना धरणात हा युवक बुडाल्याने मित्रांनी त्याला वाचवायचा खुप प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.अखेर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली.

- Advertisement -

तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकाला तातडीने कळवुन घटनास्थळी पाचारण केले. या दोन्ही टीमने शोधकार्य सुरु केले मात्र आज पाऊस जास्त असल्याने पाण्याचा जोर वाढत असल्याने रात्री ऊशिरा पर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. भावली धरण परिसरात वनविभागाने पर्यटकांना बंदी घातलेली असतांनाही पर्यटक चोरी छुप्या मार्गाने पर्यटनस्थळी दाखल होत असल्याने अशा घटना घडतात अशी चर्चा आहे.

इगतपुरी जवळ असणाऱ्या एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील सोनू सांगळे हा काम करतो. त्याचे सोबत काम करणारे त्याचे इतर सहकारी सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित यांचे सोबत जवळ असणाऱ्या जांमुंडे गावाच्या परिसरात जेथे भावली धरणाचे बॅकवाॅटर आहे या ठिकाणी दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते.

यापैकी सुनील सोनू सांगळे ( Sunil Sonu Sangle )याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांच्या संपर्कात चंद्रकांत सराई, सुरेश तेलम व अन्य सदस्यांनी सुनील सांगळे याचा शोध घेतला मात्र त्यांना उशिरा पर्यंत यश आले नाही. कसारा व इगतपुरीच्या महिंद्रा कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने सुनील सांगळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस आणि प्रशासनाने ह्याबाबत नोंद घेतली असून रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या