विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

जुने नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर परिसरात धुवाधार पाऊस ( Heavy Rain ) सुरू आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. द्वारका ( Dwarka )भागातील पखाल रोड येथे पाणी साचले होते तर विद्युत पुरवठा येथील खांबामध्ये उतरला होता. त्यावेळी एका तरुणाचा हात त्याच्यावर पडल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे.

ही घटना आज रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये बबलू खान (वय 23, राहणार नानावली, जुने नाशिक मूळ गाव अकबरपुर उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे काजी कब्रस्तान समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे विद्युत खांबात करंट उतरला होता.

बबलू खान हा तरूण बेकरी पदार्थ विक्रीचे काम करतो. तो सायकलीने जात होता. अचानक त्याचा हात त्या खांबावर लागल्यामुळे त्याचे निधन झाले. तो नानावली भागातील फेमस बेकरीत मध्ये कामाला होता. अशी माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहकले यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com