
पालखेड मिरचिचे | वार्ताहर | Palkhed Mirchiche
कुंभारी (ता. निफाड) येथील युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे...
याबाबत माहिती अशी की, कुंभारी येथील तरूण शेतकरी आनंदा उखाजी जाधव (वय ३०) हा शेततळ्यातील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा अचानक तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला.
आनंदा महावितरणच्या रानवड सबस्टेशनमध्ये काम करीत होता. महावितरणचे कोणतेही काम आनंदाला सांगितले तरी ते जबाबदारीने व तत्परने आनंदा पूर्ण करायचा. कामावरुन घरी आल्यानंतर सदर घटना घडली.
त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, चार वर्षाचा मुलगा, एक भाऊ, बहिण, चुलते असा परिवार आहे. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.