सावधान! : तरूणाईत ‘क्रायझर वर्ल्डची’ क्रेझ

गुंतवणूकद्वारे युरोतील रकमेचे आमिष, मित्र नातेवाईकांना जातायेत विनंत्या
सावधान! : तरूणाईत ‘क्रायझर वर्ल्डची’ क्रेझ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्या आणि फसवणुक करणार्‍या आर्थिंक कंपन्या यांचा मोठा इतिहास असला तरी कमी कष्टात जादा पैसे मिळवण्याच्या मोहात लाखो लोकांची करोडो रूपयांची फसवणुक झाल्याचे वास्तव आहे.

तरिही शहरात विविध नवीन गुंतवणुक योजना येतच असून आता आंतरराष्ट्रीय पातळवरील काईझर वर्ल्ड नावाच्या एका स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून ‘युरो’ मध्ये पैसे कमवण्याचे अमिष दाखवून लाखो रूपयांची गुंतवणुक करून घेतली जात असल्याचे पुढे आले आहे.

क्रायझर वर्ल्ड असे या स्वॉफ्टवेअरचे नाव असून यामध्ये 1 लाख 24 हजार रूपयांसाठी प्रारंभी 2 हजार 400 रूपये भरायचे, अशा पद्धतीने यापुढील प्रत्येक रकमेसाठी त्या तुलनेत पैशांची गुंतवणुक करता येते 4 कोटी 65 लाख रूपयांसाठी 6 लाख 71 हजारांचीही रक्कम गुंतवता येते.

यामध्ये रक्कम गुंतवणार्‍या व्यक्तीने साखही पद्धतीने 3 जणांनी रक्कमेची गुंतवणुक करून घेतल्यास सबंधीतास लगेच अर्धी रक्कम युरो मध्ये डिजीटल पेमेेंटच्या माध्यमातून डिजीटल खात्यावर जमा होते.

अशा प्रकारे शहराच्या विविध भागात याचे एजंट निर्माण झाले असून ते इतरांना यामध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडत आहेत. यासाठी ऑनलाईन, झुम मिंटिंगही होत आहेत. तर अनेकजणांनी मोठ्या याद्या तयार केल्या असून आपले नातेवाईक तसेच मित्र दररोज भेटणार्‍या व्यक्ती अगदी नाव्ही, इस्त्रीवाल्यापासून सर्वांना यामध्ये गंतवणुक करण्यासाठी आग्रह केला जात आहे.

या स्वॉफ्टवेअर द्वारे एजंटला रक्कम मिळत असली तरी केवळ गुंतवणुक करणार्‍यांना युरोमधील पैशांची भूरळ घातली जात आहे.

करोना काळात अधिच बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांना गुंतवणुक करण्यासाठी आग्रह करणार्‍या अशा नातेवाईकांची भिती वाटू लागली आहे, तर दुसरीकडे घरबसल्या ठरावी गुंतवणुक करून इतरांना गुंतवणुकीस भाग पाडल्यास पैसे मिळत असल्याने अनेक तरूण यामध्ये उतरले आहेत.

तेच आपले नातेवाईक व मित्रांना यासाठी आग्रह करताना दिसत आहेत. परंतु पुढे जाऊन यामध्ये फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सबंधीत स्वॉफ्टवेअर याबाबत कोणतीही हमी घेत नसल्याचे त्यांनी शपथ पत्रात नमुद केले आहे.

इमू, केबीसी, मैत्रेयचा इतिहास ; जिल्ह्यात थोड्या थोड्या कालावधीत अनेक आर्थिक गुंतवणुक

करणार्‍या कंपन्या आल्या. त्यांनी शहरासह ग्रामिण भागातील लाखो नागरीकांना कमी कालावधीत गुंतवणुकीवर अधिक व्याज तसेच इतर अमिषे दाखवून कोट्यवधीची गुंतवणुक करून घेतली व नंतर पलायन केले.

याच्या परिणामी अनेक कंगाल झाले, अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र तरिही नवीन कंपनी आली की त्यामध्ये गुंतवणुक केली जात आहे हे विशेष. अशा कंपन्या तसेच एजंट ंबाबत पोलीसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com