Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानितीन गडकरी धमकी प्रकरण : 'ती' तरुणी पोलिसांच्या ताब्यात

नितीन गडकरी धमकी प्रकरण : ‘ती’ तरुणी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर | Nagpur

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करत दहा कोटींच्या खंडणीची (Extortion) मागणी नुकतीच करण्यात आली होती. दहा कोटींची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती…

- Advertisement -

आता या प्रकरणात एका तरुणीला मेंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलिसांची (Police) एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे. नागपुरमधील धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी असाच एक धमकीचा कॉल त्यांच्या कार्यालयात आला होता. गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी सकाळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

धमकी देणाऱ्याने आपले नाव जयेश पुजारी (Jayesh Pujari) असल्याचे सांगितले. पुन्हा एकदा गडकरी यांना जयेश पुजारी या नावानेच धमकी आली आहे. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे.

राज्यभरात गुढीपाडव्याचा जोरदार उत्साह! ठिकठिकाणी शोभायात्रा, घरोघरी उभारली गुढी… पाहा Photo/Video

गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीने एक नंबर दिला होता. या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवावी असे त्याने म्हटले होते. हा नंबर एका तरुणीचा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Gudi Padwa 2023 : नाशकात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत, लेझीम अन् ढोलताशांचा गजर; पाहा फोटो

ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती समोर येत आहे. आता या तरुणीला चौकशीसाठी मेंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या