२४ वर्षीय तरुणीची छेडछाड; धावत्या लोकलमधून नराधमाने मारली उडी

२४ वर्षीय तरुणीची छेडछाड; धावत्या लोकलमधून नराधमाने मारली उडी

मुंबई | Mumbai

मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) काही दिवसांपूर्वी २० वर्षीय तरुणीवर चालत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार (Sexual Assult) करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक करत कारवाई केली. ज्यामुळे मुंबई ही महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला. पण या घटनेच्या काही दिवसातच आता पुन्हा एकदा २४ वर्षीय तरुणीचा चालत्या लोकलमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) ग्रँट रोड जवळ लोकलमध्ये २४ वर्षीय तरुणीची छेडछाड, अश्लिल बोलून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात (Central Railway Police Station) तरुणीच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्राँच आणि मुंबई पोलीस यांची पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला असून रेल्वे स्थानकात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

२४ वर्षीय तरुणीची छेडछाड; धावत्या लोकलमधून नराधमाने मारली उडी
मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना! आंदोलन सुरु असताना गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान भीषण प्रकार घडला होता. मुंबई, सीएसएमटी येथून पनवेलला जाणाऱ्या ७ वाजून २८ मिनिटांच्या लोकलमध्ये ही घटना घडली होती.

मुलगी एकटीच प्रवास करत असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला. या घटनेतील पीडित तरुणीने तत्काळ या घटनेची माहिती ती आरपीएफला (रेल्वे सुरक्षा दल) देत तक्रार दाखल केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

२४ वर्षीय तरुणीची छेडछाड; धावत्या लोकलमधून नराधमाने मारली उडी
प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शाेककळा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com