Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

पुणे | Pune

येथे कोल्ड्रिंक्समध्ये (Colddrinks) गुंगीचे औषध देऊन एका २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे जबरदस्तीने लग्न देखील केले. यानंतर एक दिवशी अभिमन्यू नावाच्या तरुणाने पीडितेला घरी बोलावले. यावेळी त्याने पीडित तरुणीला कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. कोल्ड्रिंक्स पिताच तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी अभिमन्यू याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच इतक्यावर न थांबता त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ (Video) देखील काढले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जेवढा चिखल फेकाल तेवढंच…; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

यानंतर ज्यावेळी पीडितेला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. यावेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. तसेच आरोपी अभिमन्यू याने याची वाच्यता कुणाजवळ केल्यास तुझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन, तसेच तुझ्या आई-वडीलांनाही मारुन टाकू, अशी धमकी दिली.

गांधींचा फोन अन् बाळासाहेबांचा अर्ज मागे; काय आहे प्रकरण?

दरम्यान, त्यानंतर पीडित तरुणीने फोटो डिलीट करण्यास सांगितले असता अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडील दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीने सहकारनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या